Tuesday, March 21, 2023

राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता- राजेश टोपे

- Advertisement -

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत असून राज्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात असलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली. महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कौतुक केलं.

पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा या बैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना टेस्ट सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”