Wednesday, February 1, 2023

कृषी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक; शरद पवारांनी व्यक्त केलं मत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक असून दिल्लीत अजूनही शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध होत आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे ते उठायला तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते योग्य नाही. त्यासाठी दुरुस्ती विधेयक सरकारनं आणलं पाहिजे. ते अधिक चांगलं होईल, असं पवार म्हणाले

- Advertisement -

कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणले पाहिजे. ते अधिक चांगले होईल. असे शरद पवार यांनी म्हंटल. दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही, पण आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असं मला वाटतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं