खाशाबा जाधव पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत हे एकदा सरकारने जाहीर करावं; कुस्तीप्रेमींमध्ये नाराजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

देशाचे पहिले ऑलम्पिकवीर कराडचे पैलवान खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे एकदा सरकारने जाहीर करावं अशी उद्विग्न भावना खशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांनी व्यक्त केली आहे. भारत सरकारने नुकतेच पद्म पुरस्काराची घोषणा केली असून याहीवर्षी स्व. खाशाबा जाधव यांना पुरस्कारापासून उपेक्षितच ठेवलं गेलं. स्व.खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार न दिल्याने त्यांचे पुत्र रणजित जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रणजित जाधव म्हणाले कि, ” २०१० पासून स्व.खाशाबा जाधव यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कार मिळावा म्हणून आम्ही झटत आहोत. विशेष म्हणजे यंदाचा लढा आमचा इतका प्रखर होता कि, राज्यातील कित्येक आमदार-खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, ३ राज्यपाल यांची शिफारस घेऊनही केंद्रानं पद्म पुरस्कारासाठी खाशाबांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं खाशाबांची कामगिरी केंद्र शासनाला अगदीच दुय्यम वाटते का?” असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे रणजित यांनीम्हटलं. तसेच जर केंद्राला खाशाबांची कामगिरी दुय्यम वर वाटत असेल तर गेली ११ वर्षे आम्ही पाठपुरावा करत आहोत, तेव्हा केंद्रानं आम्हाला एक सौजन्य म्हणून कळवायला हवं होत, कि खाशाबा जाधव यांची कामगिरी ही पद्म पुरस्करासाठी आमच्या अपेक्षेनुसार झालेली नाही आहे,” अशी उद्विग्न भावना प्रतिक्रिया रणजित जाधव यांनी व्यक्त केली.

खाशाबांनी 1952 मध्ये हेलसिंकी मिळवले होते ब्रॉन्झ पदक
1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्व. खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीत पहिले ब्रॉन्झ पदक मिळवून दिले होते. यानंतर या खेळाला खर्‍या अर्थाने जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले. वैयक्तिक खेळ प्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारे ते पहीलेच भारतीय खेळाडू होते. मात्र, केंद्र सरकारने आजवर जाधव यांच्या योग्य सन्मानाकडे दुर्लक्ष केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment