कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच मास्क वापण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात सहा जिल्ह्यातील प्रमाण जास्त असल्यामुळे केद्र सरकारने राज्याला पत्र पाठवले असून जिल्ह्यात टेस्टिंग, लसीकरण वाढवा, योग्य खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास पत्राद्वारे दिल्या आहेत.

Corona Letter

कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने केंद्रिय आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठवले असून त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे, असे पत्रात म्हंटले आहे. या जिल्ह्यात टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

राज्य शासन पुढील 15 दिवस लक्ष ठेवून

काल टास्क फोर्ससोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक ट्विट केले आहे. या ट्विमध्ये त्यांनी काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील 15दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा. मास्क वापरा, लसीकरण करून घ्या, हात धुवा व अंतर ठेवा !, असे आवाहन राज्यातील नागरीकांना केले आहे.

Leave a Comment