केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने Coke, Pepsi आणि Bisleri यांना ठोठावला मोठा दंड, नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Central Pollution Control Board) बिव्हरेज मेकर्स कोक (Coke), पेप्सी (Pepsi) आणि बाटलीबंद पाणी तयार करणार्‍या बिस्लेरी (Bisleri) यांच्यावर प्लास्टिक कचऱ्याचे डिस्पोजल आणि कलेक्शनविषयी माहिती न दिल्याबद्दल जोरदार दंड ठोठावला आहे.

हिंदुस्तान कोका-कोला बिव्हरेजवर 50.66 कोटी रुपयांचा दंड
प्रदूषण नियंत्रण मंडळाने जोरदार दंड आकारताना संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बिस्लेरीवर 10.75 कोटी, पेप्सीको इंडिया होल्डिंग्ज आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज यांना अनुक्रमे 8.7 कोटी आणि 50.66 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पतंजलीलाही एक कोटीचा दंड
कोक, पेप्सी आणि बिस्लेरी व्यतिरिक्त योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीलाही दंड ठोठावण्यात आला आहे. पतंजलीला 1 कोटी आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि पेप्सीको यांच्या जॉईंट वेंचरला Nourishco Beverages यांना 85.9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बिस्लेरीचा प्लास्टिक कचरा सुमारे 21500 टन झाला आहे. कंपनीला प्रति टन 5000 रुपये दंड आकारण्यात आला आहे. पेप्सीकोचा कचरा 11,194 टन होता.

कंपन्यांना 15 दिवसांत दंड भरावा लागेल
विशेष म्हणजे एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पॉन्सिबिलिटी (Extended Producer Responsibility) हा प्लास्टिक कचर्‍याच्या बाबतीत धोरणात्मक उपाय आहे, त्या आधारे प्लॅस्टिक बनविणाऱ्या कंपन्यांनी उत्पादनाच्या विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या सर्व कंपन्यांना 15 दिवसांत दंड भरावा लागेल, असे सीपीसीबीने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like