…म्हणून राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं वाढू लागलं ; केंद्रीय पथकाने दिला ‘हा’ अहवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 9 हजार रुग्ण आढळत असून ही चिंतेची बाब आहे. दरम्यान अचानक कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं का वाढू लागलं? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली.

कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने सांगितलं.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment