राज ठाकरे आघाडीत राहतील, छगन भुजबळ यांचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | ‘महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यंगचित्र अनेक सभांपेक्षा परिणामकारक आहेत. अलीकडील काळात राज ठाकरे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर जोरदार टिका करताना दिसत आहेत. मोदी विरोधी म्हणुन राज यांची ओळख बनत आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल गौरोद्गार काढले. तसेच राज ठाकरे आघाडीत राहतील असे सुतोवाचही भुजबळ यांनी केले. अमरावती येथील परिवर्तन यात्रेत सहभागी होऊन परतल्यानंतर नागपूर येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निश्चित झाली आहे. समविचारी पक्ष संघटनांसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे’ अशी माहिती भुजबळ यांनी दिली. राज ठाकरे यांना आघाडीत घेणार काय असा सवाल विचारला असता, ‘मनसे आघाडीत राहील परंतू निवडणुक मैदानात नाही’ असे विधान केले. ‘राज नरेंन्द्र मोदींवर जोरदार टीका करत आहेत. त्यांची व्यंगचित्रेही अतिशय टोकदार असून ती अनेक सभांपेक्षा परिणामकारक आहेत’ अशी स्तुती यावेळी भुजबळ यांनी केली.

‘राज ठाकरे आघाडीत सामिल होणार म्हणजे लोकसभा निवडणुक लढवणारच असे नाही. काही जण निवडणुक न लढवताही आघाडीत सामिल होऊ शकतात’ असे म्हणुन भुजबळ यांनी मनसे सोबतच्या आघाडीबाबत सुतोवाच केले. भुजबळ यांनी बुधवारी राज यांची मुंबई येथे भेट घेतली होती. त्याबाबत बोलताना कौटुंबिक भेटीतही राजकारणावर चर्चा होते असे भुजबळ यांनी सांगितले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

राज ठाकरे यांची आण्णा हजारेंसोबत बंद खोलीत चर्चा, पहा काय झाली बातचीत?

पंतप्रधान स्वत:च्या प्रेमात पडलेले ‘प्रसिद्धी विनायक’, राज ठाकरेंचा टोला

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, वाचा काय झाली बातचीत..

जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाला आहे – राज ठाकरे

Leave a Comment