पुणे | चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम मराठी प्रक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. निलेश साबळेंचं अँकरिंग असणारा हा कार्यक्रम सादर झाल्यापासून त्याला प्रक्षकांचा भरघोष प्रतिसाद मिळतो आहे. भाऊ कदम यांची काॅमेडी असो किंवा श्रीया बुगडे यांचे विनोद, चला हवा येऊ द्या ही मालिका रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे हे नक्की. परंतू आता याच मालिकेतील काही डाॅयलाॅग स्त्रीयांचा सन्मान राखणारे नाहीत असं म्हणत श्वेता पाटील या विद्यार्थीनीने चला हवा येऊ द्या टीमला खूले पत्र लिहिले आहे. श्वेता पाटील यांनी लिहीलेले पत्र खालीलप्रमाणे…
प्रिय चला हवा येऊ द्या टीम,
मी तुमच्या कार्यक्रमाची एक प्रेक्षक आहे. महाराष्ट्रात असतांना तुमचा शो नित्यनियमाने कधी पाहिला नाही. पण सध्या शिक्षणानिमित्त कर्नाटकात आहे. त्यामुळे काहीतरी चांगला मराठी कार्यक्रम ऐकावा, बघावा म्हणून अगदी न चुकता Zee5 वर चला हवा येऊ द्या बघत असते.
निखळ विनोद, चालू राजकीय – सामाजिक गोष्टींवर कोट्या यांमुळे मी कार्यक्रमाच्या प्रेमात पडले. सगळ्याच व्यावसायिक कार्यक्रमांनी सामाजिक जान भान ठेवून काम केलेच पाहिजे इतक्या टोकाच्या विचारांची मी नाही. मनोरंजनाच्या कार्यक्रमांकडून ती अपेक्षाही नाही. पण तरीही तुम्ही अनेकदा सामजिक विषयांना हात घालता यांसाठी तुमचे अगदी मनापासून अभिनंदन !
परंतू, एक प्रेक्षक म्हणून कार्यक्रमात झालेले, न रूचणारे बदल सांगावेसे वाटताय.
होऊ द्या व्हायरल आल्यापासून कार्यक्रमात विनोदासाठी सापडलेला मोठा विषय म्हणजे,
1)श्रेया बुगडे यांना स्वयंपाक येत नाही
2)श्रेया बुगडे यांना स्वयंपाक येतं नाही म्हणून त्यांच्या बिचाऱ्या नवऱ्याला स्वयंपाक करावा लागतो
3)श्रेया बुगडे ह्या किती मेकअप करतात ? त्यांच्याकडे किती चपला, किती ड्रेस आहेत वगैरे …
मुळात तुमच्या सेटवर एकच स्त्री आहे. आणि तिच्या कर्तुत्वाने त्यांनी त्यांची अनोखी ओळख निर्माण केली आहे. हे अक्खा महाराष्ट्र मान्य करेन. परंतू मागील काही दिवसांपासून प्रत्येक एपिसोड मधे त्यांची ओळख, मी वर उल्लेख केलेल्या गोष्टींपुरतीच मर्यादीत होऊन राहिली आहे. सेटवर असणारा प्रत्येक कलाकार make up करुनच स्टेजवर उभा राहतो, सगळ्याच कलाकारांना उत्क्रुष्ट स्वयंपाक करता येतो असही नाही परंतू टार्गेट मात्र श्रेया बुगडे असतात. का? तर ती स्त्री आहे.
आता यांवर असं उत्तर येऊ शकतं की, ‘प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे ते आम्ही देतो’ मुळात या आधी श्रेया बुगडे वर विनोद होत नसतांनाही प्रेक्षकांनी कार्यक्रमावर भरभरून प्रेम केलय. त्यामुळे प्रेक्षकांना हे अपेक्षित आहे असं म्हणता येत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही जे सामाजिक विषयांवर भाष्य करता ते सर्वच प्रेक्षकांना रुचत असं नाही, पण तरीही तुम्ही भूमिका घेता. आणि म्हणूनच तुमच्याकडून चुकीच्या गोष्टींना खतपाणी मिळू नये असे मनापासून वाटते. श्रेया बुगडेना याच वाईट वाटतं का ते माहीत नाही. परंतू ज्या घरांत स्त्री आणि पुरुष दोघंही अर्थार्जन करतात, आणि घरातली स्वयंपाक – धुणीभांडी ही कामे वाटून घेतात त्या सर्वांच्या माणूस म्हणून घडवलेल्या व्यक्तिमत्वाचा तो अपमान आहे.
तसेच मागच्या काही दिवसांत शहरातल्या मुली कसे कपडे घालतात, पुरुष कानातले घालतात तर त्यांनी टाळ्या वाजवत मागत सुटाव वगैरे …अशा टायीपचे विनोद सहज बोलले जातात. Transgender लोकं आणि स्त्रिया हे विनोदाचा विषय आहेत हा समज आपण वाढवत आहात का याचा एकदा विचार व्हावा. आपल्या विनोदातून आपण एखाद्या समूहाला दुखवत तर नाही ना हे तपासण्यासाठी अगदी आपण स्त्रीवादीच असलं पाहिजे असं काही नाही. एखाद्या समूहाला टार्गेट करुन विनोदनिर्मिती करणं हा तर कलेचाही अपमान आहे !
माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने चला हवा येऊ द्या पाहणं बंद केलं तर फारस नुकसान होणार नाही याची जाणिव मला आहे. पण महाराष्ट्राच्या सांस्क्रुतिक जडणघडणीमधे महत्त्वाचा वाटा असणारा, वेळोवेळी ठोस भूमिका घेणारा, महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांनाही आपलासा वाटाणारा हा कार्यक्रम अधिकाधिक उन्नतीकडे जावा या भावनेतून हे पत्र लिहले आहे.
आपलीच प्रेक्षक,
श्वेता पाटील
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी
‘एक वेळ हिजड्याला मुलं होतील’ असं म्हणणार्या नितिन गडकरींना दिशा शेख यांचं खूलं पत्र
इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?