चमकी तापाचा कहर-१३५ बालके मृत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राष्ट्रीय | बिहारमध्ये चमकी तापामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात आहे. आज पर्यंत १३५ बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि अजून ३०० पेक्षा जास्त बालके धोक्यातून बाहेर आलेले नाहीत. तसेच उपचाराविना मृत्य झालेल्या मुलांची संख्या अजून बाहेर आली नाही. एकूण बालकांपैकी ८५ टक्के प्रमाण हे मुलींचे असल्याचे समजत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, ११२ मृत बालकांमध्ये ८५ टक्के मुलींचे प्रमाण आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यामुळे या आजाराची लागण झालेल्या भागात कुपोषणाची स्थिती किती भयंकर आहे हे देखील उघड झाले आहे. कुपोषणामुळे मुलींचा सर्वाधिक बळी जातो. रक्तात लोहाची कमतरता असल्याने याचा धोका वाढतो ही देखील इथली गंभीर समस्या आहे.

गेल्या ४-५ दिवसापासून पालक आपल्या मुलाना रुग्ण्यालयात दाखल करण्यासाठी  घेऊन येत आहेत पण त्या मुलांना दाखल करून घेण्यात आलेले नाही. तसेच ओआरएस पुरवठा देखील योग्य प्रकारे होत नाही, या सगळ्यातून सरकार आणि प्रशासानाला परिस्थितीचे किती गांभीर्य आहे ते दिसून येत आहे.

 

दरम्यान, या चमकी तापाचा कहर कमी होत नसल्याने सुप्रीम कोर्टानेही बिहारमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय टीम लवकरात लवकर तयार करण्यात यावी यासाठी निर्देश देण्यात यावेत अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी घेणार आहे.

Leave a Comment