हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिले. यावेळी पाटील म्हणाले की, “जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढवून दाखवावी.”
भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या जोरदार राजकीय टोलेबाजी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिले आहे. राऊतांना चॅलेंज देताना पाटील म्हणाले की, जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर राऊतांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी”, असेही पाटील यांनी म्हंटले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय चर्चाना उधाण आले होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युती करण्याबाबत चर्चा केली नसल्याचे सांगितले. मात्र, यावेळी शिवसनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांना महापालिका निवडणुकीत उतरून दाखवण्याचे खुलले आव्हानही दिले. पाटलांच्या आव्हाणांनंतर त्यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार? याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.