“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए” ; चंद्रकांत पाटील यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज वसुलीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केलयानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तूर्तास थांबवण्यात येत आहे,” अशी घोषणा मंत्री राऊत यांनी केली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. “महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए !,” असे ट्विट पाटील यांनी केले आहार.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहार की, “महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए !. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपाने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तत्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे.”

तसेच “आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा,” असा टोला माजी अर्थमंत्री तथा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला आहे.

Leave a Comment