चंद्रकांत पाटलांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती ; मुश्रीफांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच माझ्यावरील भ्रष्ट्राचाराचे आरोप हे भाजपचे षडयंत्र असून चंद्रकांत पाटील हेच यामागील मास्टरमाइंड आहेत असेही ते म्हणाले.

हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही, असा टोला हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Leave a Comment