माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने भाजप कडून हे सरकार लवकरच पडेल अस भाकीत करण्यात येत आहे. आता पुण्यातील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत तुम्हांला कळेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली असून तर्क वितर्काना उधाण आले आहे.

देहूत एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. तेव्हा ते पाटलांना माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,असं सूचक विधान करून चर्चेला उधाण आणलंय.
पाटील यांच्या बोलण्याच्या नेमका काय अर्थ असावा हे पाहायला हवं.

संभाजी ब्रिगेडच्या कोणाशी चर्चा झालेली नाही. असा कोणताही विषय राज्यातील कोणत्याही नेत्याकडे आला तर त्यांनी माझ्याशी शेअर करायला हवा. आमचा ऑल इंडिया नव्हे तर ऑल वर्ल्ड पक्ष आहे. त्यामुळे इतक्या सहज आमचा निर्णय होत नाही, त्याची मोठी प्रक्रिया आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

You might also like