…त्यांना माहीत नाही की ‘पाटील क्या चीज है’; चंद्रकांतदादांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वर केंद्रीय हायकमांड नाराज असल्याच्या बातम्या सगळीकडे रंगल्या होत्या. त्याबाबत खुद्द चंद्रकांत पाटील यांनाच विचारलं असता त्यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. येवडच नव्हे तर अशा बातम्या पेरणाऱ्या लोकांना माहीत नाही की चंद्रकांत पाटील काय चीज आहे असं म्हणत त्यांनी इशारा दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रीय नेतृत्व माझ्यावर नाराज नाहीये. ज्या सुत्रांनी अथवा ज्यांनी कुणी तुम्हाला ही माहिती दिली आहे ते प्रकट करा. माझे श्रेष्ठी काय म्हणतात, ते पहायला मी समर्थ आहे. गेले 42 वर्षे मी राजकारणात आहे. माझ्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व पूर्णपणे समाधानी आहे. दिल्ली दौऱ्यामधील या अशा बातम्यांचे सूत्र आमच्याच पक्षातले असो वा बाहेरचे असोत. त्यांना माहिती नाहीये की, पाटील क्या चीज है….!

दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार वर पुन्हा एकदा टीका केली आहे. महाविकास आघाडीने 2 वर्षात काहीच काम केलं नाही…त्यांनी फक्त पैशाचे काम केलं अस म्हणत मी उद्धव ठाकरेंच अभिनंदन करणार नाही तर त्यांचा निषेध करणार असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

Leave a Comment