शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष, त्यांना संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही; भाजप नेत्याचा निर्धार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी आणखी वाढत गेली आहे. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असून महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपन नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोटहि त्यांनी केला.

विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वीच सेना-राष्ट्रवादीची युती झाली होती. फडणवीसांचा प्रभाव वापरून अधिकाधिक जागा निवडून आणा आणि पळून या. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद करा, असं आधीच ठरलं होतं. तसा अजेंडा तयार करण्यात आला होता असे बावनकुळे यांनी म्हंटल तसेच तुम्ही कुणाशीही युती केली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

ते पुढं म्हणाले, आता आगामी निवडणूकीत सेना – राष्ट्रवादी एकत्र लढली तरीही काहीही परिणाम नाही. आम्ही निवडणुकीच्या राजकारणातून शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही तसेच आगामी सर्व निवडणुका भाजपचं जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like