Sunday, February 5, 2023

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने आता भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नव्याने भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. तर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटन कौशल्य आणि अनुभवी नेतृत्व म्हणून प्रदेशाध्यपदी बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. या पदासाठी कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते आता बावनकुळे यांची प्रत्यक्ष निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांना पसंती देत त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या नियमानुसार मंत्रिपद असलेल्या नेत्याकडे पक्षातील मोथे पद दिले जात नाही. त्यानुसार आता भाजपच्या बावनकुळे व शेलार या दोघांना संघटनात्मक बांधणीकरिता पदे देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.