अहमदनगरचे नावं बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर” करा; भूषणसिंह राजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं.त्यानंतर महाराष्ट्रात देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा किंवा उस्मानाबादचे धाराशिव करा या मागण्या जोर धरू लागल्या होत्या. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले म्हणजे हमखास औरंगाबाद आता संभाजीनगर होईल अशी शक्यता नामांतर वाद्यांना वाटू लागली होती.

पण नुकतीच अजून एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी सुरू झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज श्री भूषणराजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अहमदनगर जिल्ह्याचे नावं तातडीने बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर” करावे अशी मागणी केली आहे.

भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासन व आदर्श न्याय पदधतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्यात खऱ्याअर्थानं राम आणला. जेंव्हा हिंदूस्थान परकीय राजवटीमुळे शतखंडीत झाला होता, त्यास अखंडीत ठेवण्याच काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिराची निर्मिती केली व शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला व हिंदू संस्कृती ला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला.

अशा या महान व प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेर(जन्म स्थान) अहमदनगर जिल्हयातील चौडी है आहे. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. देशाला अखंडीत ठेवलं. त्यांच्या महान स्मृतीपुढे नतमस्तक होऊन, अहिल्यादेवींवर निष्ठा असणाऱ्यांच्या लोकभावनेचा सन्मान ठेवत, ‘अहमदनगर जिल्ह्याचे ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे तातडीने नामांतर करावे…ही नम विनंती करतो. शेवटी आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार? जुलमी परकीय राजवटीचा की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा? हे महाराष्ट्रातल्या जनतेनं मनात ठरवलं आहे! आता निर्णय तुमचा आहे.– भूषणसिंह राजे होळकर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment