हिंगणघाट जळीतकांड: नराधम विकी नगराळे विरोधात ४२६ पानी आरोपपत्र दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । हिंगणघाट येथे एका महाविद्यालयीन प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार याच महिन्याच्या सुरुवातीला घडला होता. विकी नगराळे या युवकाने केलेल्या या गंभीर प्रकाराबाबत तब्बल २६ दिवसांनी ४२६ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका तरूणाने केला होता. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत.

या पीडितेवरील उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच पीडित मुलीच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नागपूरला रवाना केली होती मात्र ही पीडिता अतिजास्त जळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विकी नगराळेविरोधात खटला ही दाखल केला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment