Wednesday, October 5, 2022

Buy now

पुण्याच्या चतुःशृंगी मंदिराबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील

नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील

विद्येचे माहेरघर असणार्या पुण्याती अनेक प्राचीन मंदिरे आणि मध्ययुगीन मंदिरे ही पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचे अवशेष आहेत असेच एक मंदिर पुण्याच्या पश्चिमेकडे डोंगरांच्या पूर्वेकडील डोंगर उतारावर आहे.हे देवीचे मंदिर चतुःशृगीचे देऊळ म्हणून प्रसिध्द आहे.या डोंगरालाही चतुःशृंगीचा डोंगर म्हणून ओळखले जाते. फारसे उंच नसणार्या या मंदिराला ऐंशी पायर्या आहेत.

चतुःशृंगी देवीच्या इतिहासाचा धागा पेशवाईतील दुर्लभशेठ नावाच्या गुजराती सावकाराशी जोडला जातो.दुर्लभशेठ नाशिकजवळील वणीच्या सप्तशृंगीचा भक्त होता. चतुःशृंगीची कथा अशी सांगितली जाते की, दुर्लभशेठला म्हातारपणी सप्तशृगींला जाववेना. त्यामुळे देवीने स्वप्नात येऊन पुण्याच्या वायव्य भागातील डोंगरात प्रगट होत असल्याचे सांगितले, आनंदीत होऊन दुर्लभशेठने शोधाशोध केल्या नंतर १७८६ साली साध्याच्या मंदिर परिसरात दगडाच्या गोलाकार स्वरुपात देवी सापडली या नंतर दुर्लभशेठने कृतज्ञापूर्वक तीथे देवीचे मंदिर बांधले. पुढे अनगळ घराण्यास देवीच्या पूजेचा मान मिळाला. मंदिरा पर्यंत जाणार्या पायऱ्या, सभामंडप, विहिर ही पुण्याच्या नरपतगीर गोसावी यांनी बांधल्या आहेत.पुढे पुण्यातील सराफांनी जीर्णोध्दार समिती नेमून रस्ता, वीज, पाण्याची सुविधा केली.

हळूहळू देवीचा उत्सव,यात्रा सुरु झाल्या आणि आजूबाजूच्या गावातील भावीकही या देवीला येऊ लागले. चतुःशृंगीच्या मंदिरातील नवरात्र उत्सव हा अश्विन शुध्द प्रतिपदा ते दसर्या पर्यंत प्रामुख्याने चालू राहतो आणि कोजागिरी पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते. दसर्याच्या दिवशी देवी पालखीतून शिलंगणाला जाते.हा छबिना मोठा असून संध्याकाळी रोषणाईसह निघतो.

Pranav Patil

प्रणव पाटील
9850903005
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून आय.एल.एस महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत).

संदर्भ –
1)कुलदैवत (संपादन) – डॉ.सरोजनी बाबर
2) शहर पुणे (संपादन)- अरुण टिकेकर
इतर महत्वाचे –

मातृदेवता सटवाई उर्फ षष्ठी! | नवरात्र विशेष #१

जैन देवता पद्मावती | नवरात्र विशेष #२

जखिण उर्फ यक्षिणी | नवरात्र विशेष #३

कोल्हापुरच्या श्रीमहालक्ष्मी च्या स्थापनेचा इतिहास | नवरात्र विशेष #४