देशातील ‘या’ शहरांमध्ये विकलं जात आहे स्वस्त सोनं, यामागील कारणे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । जर आपण दुबईला जाणार असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. येथे जगातील सर्वात स्वस्त सोनं मिळतं तसेच येथी सोन्याची गुणवत्ता देखील खूप चांगली असते. जगभरातील लोक दुबईतील डेरा सिटी सेंटरमध्ये सोने खरेदीसाठी दाखल होतात. जगातील सर्वात स्वस्त सोने येथे मिळतं. भारतासह बर्‍याच देशांच्या तुलनेत येथे सोन्याच्या किंमतीत 15 टक्क्यांनी घट आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत वेगळी असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या शहरांबद्दल माहिती रन देणार आहोत जेथे सर्वांत स्वस्त सोने मिळते आहे.

केरळमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं – देशातील सर्वात स्वस्त सोनं केरळमध्ये मिळतं. दक्षिण भारतातील बहुतेक राज्यांत सोन्याची किंमत पश्चिम आणि उत्तर भारताच्या तुलनेत कमी आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये मुंबई किंवा दिल्लीपेक्षा स्वस्त सोनं आहे.

केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,950 रुपये आहेत, कोलकातामध्ये ते 49,740 रुपये, मुंबईत 49,550 रुपये, दिल्लीत 49,260 रुपये, अहमदाबादमध्ये 49,700 रुपये, लखनौमध्ये 49,260 रुपये तर पटनामध्ये 49,550 रुपये आहेत.

त्याचबरोबर इतर दक्षिण भारतीय शहरांमध्येही त्याचे दर कमी आहेत. उदाहरणार्थ, बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगरुरु येथे प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,650 रुपये आहे, विजयवाडा, मदुराई आणि चेन्नई येथे ते 48,350 रुपये आहेत. आपण जर ऑनलाइन सोने खरेदी करत असाल तर पहिले त्या शहरातील सोन्याची किंमत जाणून घ्या. यानंतर त्याची शुद्धता तपासा.

जर आपण उत्तर भारतातील शहरांबद्दल चर्चा केली तर देशातील काही प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत अशी आहे. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅमची किंमत 53 हजार 740 रुपये आहे, मुंबईत ते 50 हजार 550 रुपये आहे. त्याचबरोबर लखनऊ आणि जयपूरमध्ये किंमत 53 हजार 740 रुपये आहे. तसेच मुंबईतील 10 कॅरेट सोन्याचे 22 कॅरेट सोन्याची किंमत 49 हजार 550 रुपये आहे, केरळमध्ये त्याची किंमत 46 हजार 950 रुपये आहे. मुंबई आणि केरळमधील सोन्याच्या किंमतीत महत्त्वपूर्ण फरक असल्याचे पाहायला मिळते. आम्ही सांगत असलेल्या या फरकाचे एक मोठे कारण आहे.

सोन्याच्या किंमतीत फरक असण्याचे कारण- भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे भाव एकसारखे नसतात. देशाच्या वेगवेगळ्या सराफा बाजारात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत वेगळी आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे राज्य सरकारे आणि प्रशासनाने सोन्यावर लादलेला स्थानिक कर, जो प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगळा आहे.

याशिवाय स्थानिक सराफा असोसिएशन देखील त्यांच्या वतीने सोन्याचे दर ठरवते. यामुळे, सोन्याच्या किंमती एका शहराहून दुसर्‍या शहरात बदलतात. इतकेच नव्हे तर दररोज दोनदा सोन्याच्या किंमती सुधारित केल्या जातात. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्या किंमतींचा कल दिसून येतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment