निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची निवड ; मराठमोळ्या आगरकरचा पत्ता कट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर अॅबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती हे निवड समितीचे सदस्य असणार आहेत.

निवडकर्ता पदासाठी माजी भारतीय खेळाडू अजित आगरकर याच्यासह वेस्ट झोनमधून नयन मोंगिया आणि अभय कुरुविला यांनी देखील आवेदन दिले होते. त्यांच्यासोबतच नॉर्थ झोन मधून चेतन शर्मा, मनिंदर सिंह, विजय दहिया, अजय रात्रा आणि निखिल चोप्रा, तर ईस्ट झोनकडून शिव सुंदर दास, देबाशिष मोहंती आणि राणादेव बोसदेखील या पदाच्या शर्यतीत होते.

सर्वाधिक सामने खेळणाऱ्या मराठमोळ्या अजित आगकरचीच निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. ज्या पाच खेळाडूंची सल्लागार समितीने निवड केली होती, त्यामध्ये सर्वाधिक सामने हे अजित आगरकरच्या नावावर होते. त्यामुळे आगरकरची निवड करण्यात का आली नाही, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment