व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लड विरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारताचा स्टार फलंदाज Cheteshwar Pujara ने पुनरागमन केले आहे. त्याने सांगितले की, रणजी ट्रॉफी आणि काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळल्यामुळे त्याला फॉर्ममध्ये आणि राष्ट्रीय संघात परत येण्यास मदत झाली. हे लक्षात घ्या कि, या वर्षाच्या सुरुवातीला पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नव्हते. मात्र इंग्लंड मधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी पाच सामन्यांमध्ये 120 च्या सरासरीने 720 धावा केल्यानंतर त्याची इंग्लंडविरुद्धच्या 5व्या कसोटीसाठी पुन्हा राष्ट्रीय संघात पुन्हा निवड निवड करण्यात आली.

Cheteshwar Pujara Signs Sussex Contract For County Championship, Royal  London One-Day Cup Competition

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईविरुद्ध खेळताना पुजाराने 83 चेंडूत 91 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यानंतर काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी दोन द्विशतकांसह चार शतके झळकावली. Cheteshwar Pujara ने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सांगितले की, “शक्य तितके प्रथम श्रेणी सामने खेळणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. जेव्हा आपल्याला फॉर्ममध्ये यायचे असते तसेच तेव्हा काही मोठे डाव खेळणे महत्त्वाचे असते.”

County Championship: Cheteshwar Pujara Hits His Second Consecutive of Season

“म्हणूनच, जेव्हा मी ससेक्सकडून खेळलो तेव्हा मी हे करू शकलो. जेव्हा मी डर्बीशायरविरुद्ध पहिली मोठी खेळी खेळलो तेव्हा मला वाटले की मला माझी लय सापडली आहे. आता माझी एकाग्रता आणि सर्वकाही व्यवस्थित चालले होते. ससेक्ससोबत माझा वेळ चांगला गेला.” Cheteshwar Pujara ने पुढे म्हंटले की, रणजी ट्रॉफीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्याला काउंटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली.

India craved the Pant doctrine but what they got was Cheteshwar Pujara |  England v India 2021 | The Guardian

“रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून मी तीन सामने खेळलो. तिथे मला माझी लय सापडण्यातमदत झाली. मला हे माहित होते की, मी चांगली फलंदाजी करत आहे.” Cheteshwar Pujara बरोबरच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णा देखील चार दिवसीय सराव सामन्यात लीसेस्टरशायरकडून खेळतील. हे लक्षात घ्या कि, एक जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना होणार आहे.

हे पण वाचा :

Bank FD : आता ‘या’ विदेशी बँकेने देखील आपल्या FD वरील व्याज दरात केली वाढ !!!

Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!

Multibagger Stocks : प्लॅस्टिक पाईप बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

खुशखबर !!! Indusind Bank कडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ