छ. उदयनराजेची बाॅक्सिंग किटवर तुफान फाईट करत लाॅकडाऊनला विरोध

पस्तीस वर्षांपूर्वीचे मित्र अजिज भाई मुजावर यांच्या घरी भेट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जावळी तालुक्यातील कुडाळ येथे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पस्तीस वर्षांपूर्वीचे मित्र अजिज भाई मुजावर यांच्या घरी भेट दिली. काल सातारा येथे लाॅकडाऊनच्या विरोधात भीक मागो आंदोलनानंतर कुडाळ येथे बॉक्सिंग किटवर तुफान बॉक्सिंग करत लाॅकडाऊन विरोधात पुन्हा एकदा आपला निषेध व्यक्त केला आहे. जीमला लाॅकडाऊनमुळे बंदी असल्याने छ. उदयनराजे यांनी जीममध्ये कसरतही केली.

छ. उदयनराजे हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलने लोकांच्यात चर्चेचा विषय बनत असतात. आजही आपल्या जुन्या मित्राला भेटायला गेलेल्या छ. उदयनराजे यांनी हटके स्टाईलमध्येच मित्राची भेट घेतली. यावेळी आपल्या मित्रासाेबत फोटोसेशन करत नेहमीच्या स्टाईलचा अंदाजही दाखवला.

कुडाळ येथे एका जिमवर बॉक्सिंग किटवर तुफान फायटिंग केली. त्यानंतर युवकांना तंदुरुस्तीचा सल्लादेखील दिला. व्यायाम करा, भरपूर पौष्टिक खा असा सल्लाही दिला. निरोगी शरीर हेच माणसाचे खरी संपत्ती असे देखील युवकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिममधील 14 किलो वजनाचा करेल एका झटक्यात फिरवला.  यावेळी उदयनराजे यांच्या फिट आणि फिटनेसचा प्रकार पाहता उपस्थित युवक देखील आवाक झाले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like