छगन भुजबळांनी केली ‘ओबीसी’साठी आंदोलनाची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसतो आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार केला आहे. नाशिकमध्ये आजच समता परिषदेने राज्यभरात आंदोलनाची घोषणा केली आहे त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आज बैठक पार पडली या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर आता रस्त्यावरील लढाई देण्यासाठी समता परिषदेने घोषणा केलीय. समता परिषद आंदोलन हे ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आहे. राज्य सरकार अथवा केंद्र सरकार असेल कोणीही यावर मार्ग काढावा यासाठी ओबीसी समाज आंदोलन करणार आहे. इतर समाजही आंदोलन करत आहे ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आमची काही हरकत नाही. कोर्टात विषय संपला म्हणजे आरक्षण विषय संपला असं नाही असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण यासाठी घटना दुरूस्ती झाली पाहिजे अस काहींचे मत आहे ती काही चुकीची नाही. परभणी येथे ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल होत आहेत, काही ठिकाणी इतर समाज आंदोलन करतात मग येथेच गुन्हे दाखल का, असा सवालच करत भुजबळ यांनी स्वत:च्या सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment