शेतकऱ्यांच्या संसाराची होळी होत असताना इकडे नेते रंग उधळत होते; अधिवेशनात भुजबळांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तो पुरता हवालदिल झाला आहे. त्याच्या संसाराची होळी झालेली असताना इकडे नेते रंग उधळत होते. हे चालणार नाही. राज्य सरकारने तात्काळ गुजरातच्या धर्तीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातही निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान द्यावे, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीवरून सभागृहात आज आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी त्यांनी सभागृहात अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या चर्चेवेळी गुजरात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला. यावेळी भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा आयुष्याचा बेरंग झाला आहे. मात्र, दुसरीकडे नेते रंग उधळत होते. महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्य हे लहान आहे. पण त्यांच्या सरकारने तेथील शेतकऱ्यांच्या पिकाला अनुदान दिले आहे. वाहतुकीसह निर्यातीसाठी सुद्धा अनुदान दिले आहे.

शेतकरी मित्रानो, शेतीशी निगडित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, रोजचा बाजारभाव यांसारख्या सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. तसेच हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, कृषी केंद्रे, खत दुकानदार यांच्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. शेतकऱ्यांचे जीवन अगदी सुखकर व्हावं आणि त्याच्या पैशाची आणि वेळेची बचत व्हावी या उद्देशाने बनवलेले Hello Krushi अँप गुगल प्ले स्टोअर वरून आजच डाउनलोड करा आणि 1 रुपयाही खर्च न करता सर्व सुविधांचा लाभ घ्या

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here

याशिवाय आपल्या पेक्षा कांदा पीक त्यांच्याकडे फारच कमी असतांना ते मदत करत आहे तर आपण का करू नये. राज्यात नाफेडकडून केली जाणारी खरेदी ही बाजार समितीत जाऊन केली जात नाही. परस्पर कंपनीच्या माध्यमातून बाहेरच्या बाहेर खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे भुजबळ यांनी यावेळी म्हंटले.