Saturday, January 28, 2023

चिकन विक्रेत्याच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; सांगलीमधील घटना

- Advertisement -

मिरज : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असले तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतत निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीतील मिरज याठिकाणी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अन् गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला आहे. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला. यानंतर मिरज पोलिसांनी आरोपी तरुणावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिरज पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

आरोपी व्यक्तीचे नाव फैय्याज मेहबूब कोकणे असून तो मिरजेतील बोकड चौक या ठिकाणचा रहिवाशी आहे. आरोपीचे बोकड चौकात चिकनचे दुकान आहे. या ठिकाणी चिकन घ्यायला येणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी कोकणेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. यानंतर 22 मार्च रोजी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आरोपी कोकणे मुलीच्या घरी गेला. याठिकाणी आरोपीने पीडितेला घराबाहेर बोलावून नकळत गुंगीची गोळी खायला दिली. यानंतर आरोपी पीडित मुलीला तिच्याच घरात घेऊन गेला.

- Advertisement -

घरात नेल्यानंतर आरोपीने पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितिने आरोपीला विरोध करताच आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने अशाच प्रकारे अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेने आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून या प्रकरणाची माहिती आपल्या आईला सांगितली. यानंतर पीडितेच्या आईने आरोपी तरुणाविरुद्ध मिरज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी फैय्याज मेहबूब कोकणे विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिरज पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.