Monday, February 6, 2023

मुख्यमंत्री मराठा आरक्षण प्रश्नी पाया पडू नका, राजीनामा द्या : विनायक मेटेंची मागणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिक येथे शिवसंग्रामचे नेते मेटे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत गंबीरपणे विचार करून निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही आणि सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल. त्यामुळे त्यांनी आता आरक्षण प्रश्नी पाया न पडता थेट आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून तो तत्काळ केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी मेटे यांनी  यावेळी केली.

यावेळी मेटे म्हणाले, “मराठा आरक्षणाचा प्रश्न आता राष्ट्रपती व पंतप्रधानांनी सोडवावा. प्रसंगी आम्ही केंद्र सरकारच्या पायाही पडायला तयार आहोत”, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढंच सांगणे आहे कि, त्यांनी केंद्राच्या पाया न पडता आता थेट आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मराठा आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठवा. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी सर्वांकडून प्रयत्न केले गेले. मात्र, राज्य सरकार मराठा समाजाला न्याय मिळवू देण्यात कमी पडले. मराठा आरक्षण न्यायालयाने रद्द केले असल्यामुळे आता नवीन कायदा होऊ शकत नाही. आरक्षण रद्द प्रश्नी सर्वस्वी आघाडी सरकारच जबाबदार आहे.

- Advertisement -

सध्या कोरोनाचा काळ असून सर्वत्र लॉकडाऊनही लावण्यात आलेला आहे. अशा परिस्थिती राज्य सरकारने नाचता येईना अंगण वाकडे अशा प्रकारची भूमिका घेऊ नये, अन्यथा आम्ही लॉकडाऊननंतर तीव्र स्वरूपात आंदोलन करू. तसेच बीडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या विरीधात मोठा मोर्चा काढणार असल्याचा असा इशाराही यावेळी मेटे यांनी दिला.