….म्हणून मध्यरात्रीच मुख्यमंत्र्यांनी विश्वास नांगरे पाटलांना केला फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन मला या वर्षीची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे, असं मुख्यमंत्री नांगरे पाटील यांना म्हणाले. नांगरे पाटलांनी खास फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे.

मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो”, असं मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोरोनाशी लढा देताना गेले वर्षभर 98 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हजारो जन योद्धयाप्रमाणे या आजाराशी झुंजले. कोरोना शहीदांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी 50 लक्ष आणि पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने मिळणारी 10 लक्ष मदत ही पथदर्शी आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी दिलासादायक भेट ही मनोबल वाढवणारी ठरली, अशा भावना सहपोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी व्यक्त केल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment