Wednesday, February 8, 2023

राज्याच्या अधिकारावर गदा येतेय का पाहिलं पाहिजे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात एनसीबीकडून केल्या जात असलेल्या कारवाईवरून व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच महत्वाचे विधानही केले. तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, काही अधिकार वगळता राज्य सार्वभौम आहेत. राज्याच्या अधिकारावर गदा येतेय का पाहिलं पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 1958 सालापासून एक आरोपी गायब असल्याचे तुम्ही म्हणता. पण आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे. तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. धाडसत्रं सुरू आहे. या पद्धतीला चौकट आणण्याची गरज आहे. न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही. ही सर्वांची जबाबदारी आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील कायदा व एनसीबीच्यावतीने ड्रग्ज प्रकरणात केल्या जात असलेल्या तपासाच्या कार्रवाईवरुन भाजप व केंद्र सरकारवरही निशाणा साधला घटनेत केंद्राला किती अधिकार आहेत. राज्याला किती अधिकार आहेत? राज्याच्या वर केंद्र आहे का? काही अधिकार वगळता राज्य सार्वभौम आहेत. राज्याच्या अधिकारावर गदा येतेय का पाहिलं पाहिजे. तुझा अधिकार वेगळा आणि तुझी मर्जी वेगळी हे कुणीतरी सांगितलं पाहिजे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.