हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक पक्षातील श्रेष्टींकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस या पक्षांचाही समावेश आहे. पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक घेतली. तसेच पक्ष बळकटीकरणासाठी गावागावात १२ जुलै ते २४ जुलै काळात शिवसंपर्क मोहीम राबवावे. जनतेची कामे करा, आघाडी किंवा युतीची चिंता करू नका, असे आदेश यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत जिल्ह्यातील पक्षाचे चालले काम याविषयी चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रमुखांना शिव संपर्क अभियानाविषयी माहिती दिली. व गाव गावात शिवसेना पोहचविण्यासाठी दि. १२ जुलै ते २४ जुलै या कालावधीत शिव संपर्क मोहीम राबविण्याचे आदेश दिले.
यावेळी पक्षप्रमुख ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांकडून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीविषयी माहिती घेतली. तसेच माझं गाव कोरोनामुक्त गाव, आपल्या गावात हि मोहीम प्रत्येक शाखेत शाखाप्रमुखानी राबवावी. त्यासाठी महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या विभागात व प्रत्येक प्रभागात बैठका घ्याव्यात, असे आदेश यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिले.