मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव अद्याप सरकारपुढं आलेला नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात शक्रवारी मुस्लिम आरक्षणाबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली होती. राज्य सरकार मुस्लिमांना सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी केली होती. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं असता मुस्लिम आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप सरकारपुढं आलेला नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आज मांडली.

पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ”मुस्लिम आरक्षणाचा अद्याप कुठलाही प्रस्ताव आमच्यापुढं आलेला नाही. तोपर्यंत विरोधकांनी आदळआपट करण्याची गरज नाही. ही एनर्जी मुद्दा आल्यावर वापरण्यासाठी जपून ठेवा.” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

एनपीआरसाठी समिती स्थापन करणार
‘एनआरसी व एनपीआरचा अभ्यास करण्यासाठी सरकार समिती स्थापन करणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.  ही समिती या सगळ्याचा अभ्यास करेल. मात्र, कुठल्याही कायद्यामुळं राज्यातील एकाही नागरिकाचा हक्क हिरावला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment