चिकलठाणा पोलिसांची दमदार कामगिरी; मोटर सायकल चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला केले जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी ई-पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 13) चिकलठाणा पोलीस पेट्रोलिंग करित असतांना निपानी फाटा बीड रोड येथे एक मोटारसायकल चोरीस गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचवेळी चितेगाव परिसरात पोलिसांनी मोटारसायकल चोरास अटक करून मोटारसायकल जप्त केली. त्या चोरट्यानी विचारपुस केली असता त्याने आणखी चार साथीदार असून ते त्याचेच गावात तिर्थपुरी येथे राहत असल्याचे सांगीतले. त्यावरून तिर्थपूरी मध्ये दोन आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन ०९ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.

वरील मोटार सायकल पैकी पोस्टे चिकलठाणा येथे ०३, पोस्टे बिडकिन येथे ०१, पोस्टे अंबड जि.जालना येथे ०१, पोस्ट करमाड ०१ असे सहा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. उरवरीत चार मोटार सायकल त्यांनी कोठुन चोरुन आणल्या याबाबत व तपास चालू आहे.
शहाजी सुधाकर कुरकुटे, तात्यासाहेब अशोक भालेकर, शाहरुख मुक्तार शेख सर्व रा. तिर्थपुरी ता. घनसावंगी जि. जालना असे चोरटयांची नावे असून यांचेकडुन एकुण १० मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत ४ लाख, ८३ हजार रुपये इतकी आहे. अटक तीन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी येथे हजर केले असता दिनांक १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप दुबे, लहू थोटे, गणेश मुळे, दिपक देशमुख, दिपक सुरोशे, आण्णा गावडे, योगेश तरमाळे यांनी केली आहे. या अंतरजिल्हा टोळीकडून आणखी काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment