कानातील सोन्याच्या कड्यांसाठी घेतला ५ वर्षीय चिमुकल्याचा जीव; क्राईम पेट्रोल पाहुन केला खुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : पैशासाठी खून करून मृतदेह जुन्या घरातील स्वच्छतागृहात टाकल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे . तुळजापूर तालुक्यातील सांगवी ( मार्डी ) येथे गुरूवार दि .१६ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षिय अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. सांगवी येथील मनोज बागल यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य असून ते वाहन चालक म्हणून काम करुन कुंटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. गुरुवारी त्यांचा मुलगा ओम बागल ( वय ५ ) हा मोबाईलवर गेम खेळत होता. वडीलांनी मोबाईल मागून घेतला असता त्याने त्यांच्याकडून १० रुपये मागून घेतले . त्यानंतर तो डोकेदुखीची उपाय करणारी गोळी आणण्यासाठी दुकानात गेला, महिला दुकानदाराने त्यास औषधी गोळी मागितल्याने दिली नाही, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. वडीलांनी दुकानदाराकडे जाऊन चौकशी केली आसता आताच परत गेला म्हणून सांगितले, त्यानंतर वडिलासह नातेवाईक व शेजाऱ्यांनी सगळीकडे शोधाशोध केली पण पण तो मिळून आलाच नाही. त्यामुळे त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली.

सकाळी शोध घेत असताना गावातील एका बंद असलेल्या घरातील जुन्या आडगळीत असणाऱ्या खोलीतील स्वच्छतागृहात त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या कानातील सोन्याच्या कड्या काढून घेतल्याने कानाजवळ जखम झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोर पाटील, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी घटनास्थळी भेट देवून तातडीने तपासकार्य सुरू केले. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास लावून पोलिसांनी एका १७ वर्षिय युवकास ताब्यात घेतले, तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले.

सांगवी मार्डी हे गाव वाहन चालकांचे गाव म्हणून ओळखले जाते, तिथे कधीही साधी हाणामारीची घटना देखील घडत नाही. मात्र चिमुकल्याच्या खुनाच्या घटनेने ग्रामस्थात मोठी खळबळ उडाली होती. मारेकरीही अल्पवयीन खून करणारा यूवक हा १७ वर्षिय अल्पवयीन आहे, तो उस्मानाबाद येथील एका इंग्रजी शाळेत शिकत आहे. तो वडिलांच्या खात्यातून पैसे काढून खर्च करीत असे, त्या पैशाची भरपाई करण्यासाठी त्याने गुरूवारी दु . १२ वा. सुमारास रस्त्यावर कुणीही नसल्याचे पाहून दारासमोरून जाणाऱ्या ओमला घरात ओढले. नायलॉन दोरीने गळा आवून त्याने त्याचा खून केला. नंतर त्याच्या कानातील सोन्याच्या कड्या काढून घेतल्या व मृतदेह शेजारील घरात जुन्या स्वच्छतागृहात टाकला, सकाळी आरोपीच्या वडिलांनी चिमुकल्याचा मृतदेह पाहिला असता त्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती कळवली.

Leave a Comment