कराड | येथील मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखेच्या वतीने पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून विविध शाळांत मूला-मुलींसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक वितरण समारंभ झाला. यावेळी विजेत्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास मुथुट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखा प्रमुख जासमीन काझी, शाखेतील कर्मचारी आशिकेश मोरे, कल्याणी माने, संदीप नलवडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेतील सहभागी मुलांना सन्मानित करण्यात आले.
शाखाप्रमुख जासमीन काझी म्हणाल्या, मुलांच्या कल्पनाशक्तीचा व सृजनशीलतेचा अविष्कार या स्पर्धेतून पाहायला मिळाला. प्रत्येक मुला- मुलीच्यांत वेगवेगळे गुण असतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा घेणे गरजेचे आहे. यापुढील काळातही मुथुट फिनकाॅर्प सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्नशील राहील. कार्यक्रमात स्पर्धेत सहभागी मुलांचे पालक उपस्थित होते.