एक- दोन नाही तर तब्बल 200 गाड्यांची एकमेकांना धडक; हायवेवर मोठा अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे वर्ष तसं पाहिलं तर खूप कठीण गेलं. या वर्षभरात खूप मोठे अपघात घडले. या अपघातात अनेकांचे जीवही गेले. मात्र, वर्षभरातील जगातील सर्वात मोठा अपघात हा चीनमध्ये घडला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण दाट धुक्यांमुळे चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 200 गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

थंडीचा महिना सुरु असून दाट धुक्याचे जाळे ठिकठिकाणी दिसून येत आहेत. अशात महामार्गावरून गाडी चालवणे कठीण झाले आहे. दाट धुक्यामुळे गाडीचा वेग आणि अंदाज घेणे महत्त्वाचे ठरते. मात्र, असे असताना गाडी चालवताना एक चूक चांगलीच महागात पडू शकते. त्याचाच प्रत्यय चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात वाहनचालकांना आला आहे.

चीनमधील एका पुलावर एका मागोमाग एक करत 200 गाड्या एकमेकांवर आदळल्या. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत झेंगक्सिन हुआंगे पुलावर काही गाड्या आणि ट्रकचा अपघात झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी गाड्या दुसऱ्या गाड्यांवर चढल्याचं दिसत आहे. या अपघातात काही जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

ज्यावेळी हि घटना घडली त्यावेळी घटनास्थळी 200 हून अधिक वाहने होती. तसेच या अपघातात काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. चीन सरकारच्या माहितीनुसार, घटनास्थळी बचावासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आणि 66 जवान दाखल झाले होते.