व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणामुळे चीनमधील महिला पतीला खाऊ घालतात नपुंसक बनवणारे औषध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – साहजिकच आहे प्रत्येक महिलेला वाटत असते कि आपल्या पतीने किंवा प्रियकराने आपल्याशिवाय अन्य दुसऱ्या महिलेकडे पाहू नये. यासाठी महिला वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. मात्र चीनमधील महिला यासाठी असा काही उपाय करतात कि तुम्ही वाचून थक्क होणार. पती आपल्याला धोका देऊ नये यासाठी महिला त्यांना एक औषध देत आहे. या औषधामुळे पुरुषाला नपुंसक येते. पण तरीदेखील चीनमधील महिला आपल्या पतीला गुपचूप हे औषध देतात. पती नपुंसक व्हावा आणि त्याने दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होऊ नये, यासाठी हे औषध देण्यात येते असे त्या ठिकाणच्या महिलांचे म्हणणे आहे.

चीनमधील महिला पतीला डायथायलस्टीलबेस्ट्रोल हे औषध खाऊ घालतात. या औषधामुळे पुरुषाला उत्तेजीत होण्यापासून रोखले जाते. या औषधाबाबत सोशल मीडियावर अनेक कथासुद्धा वाचायला मिळतात. या संदर्भात ‘वी चॅट’वर एक लेख प्रसिद्ध झाला होता. चीनच्या काही महिलांनी ऑनलाईन पद्धतीने हे औषध मागवले आहे त्यानंतर ते आपल्या नवऱ्याच्या नकळत जेवणात किंवा ज्युसमध्ये मिसळून देतात. या औषधामुळे त्यांच्या पतींनी त्यांना धोका देणे बंद केले. या औषधावर अनेक महिलांनी फिडबॅक दिला आहे. हे औषध धोकेबाज पतींसाठी उपयुक्त असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.

हा लेख वायरल झाल्यानंतर ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवरून हे औषध हटवण्यात आले आहे. या संदर्भात चीनमधील कायदेतज्ज्ञांनी महिलांना ताकीद देत पतीला शारिरीक त्रास झाल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच त्यांनी ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा इशारा दिला आहे.