आम्ही यात काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची; साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ ढसाढसा रडल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेनंतर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या अक्षरश: ढसाढसा रडल्या.

खरंतर मी आता निशब्द झाले, माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. मी डॉक्टरांशी आता बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका

गेल्या ८ दिवसांत १३ वर्षांच्या मुलीवर १४ लोकांनी बलात्कार केला, ६ वर्षांच्या मुलीवर रिक्षात बलात्कार झाला. ठाण्यात अतिरिक्त आयुक्तांची बोटं छाटली गेली. आज सकाळी अमरावतीत १७ वर्षांच्या ७ महिन्यांच्या गर्भवती मुलीवर बलात्कार झाला, तिने गळफास लावून संपवून घेतलं. साकीनाक्यातली ही महिला मृत्यूशी झुंज देत होती. आम्ही यात काही करू शकलो नाही. आम्ही भाषणं करण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काही करू शकलो नाहीत. ही हार आहे आमची. आणि याचंच मला दु:ख आहे”, असं त्या म्हणाल्या.

Leave a Comment