ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ; मिळाले तब्बल ‘इतके’ कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी आज खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस याला आत्तापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट बोली लागली आहे. राजस्थान रॉयल संघाने मॉरिसला तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

ख्रिस मॉरिसला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स (आधीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) यांच्यात चूरस होती. अखेर त्याच्यावर १६ कोटी २५ लाखांची बोली लावत राजस्थानने त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले.

मॅक्सवेल आरसीबीच्या ताफ्यात –

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. बंगळुरुने मॅक्सवेलसाठी तब्बल 14 कोटी 25 लाख इतकी रक्कम मोजली आहे. मॅक्सवेलची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. मॅक्सवेलला 2020 मध्ये पंजाबने 10 कोटी 75 लाखांमध्ये आपल्या संघात घेतलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like