वजन कमी करण्यासाठी हा मसाला ठरेल रामबाण उपाय; होतील हे मोठे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल वजन वाढने ही आरोग्यासाठी घातक गोष्ट ठरत आहे. सर्वांनाच एकदम स्लिम अँड ड्रीम व फिट व्हायचं आहे. त्याबाबत सोशल मीडियावर अनेक मिम्स बनत असतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेकजण नाही नाही ते उपाय करतात. मसाले खाणे बंद करतात. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की हेच मसाले तुमचं वजन कमी (Weight Loss) करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की हे कस शक्य आहे. तर जाणून घेऊ. आपल्या सर्वांनाच चटकदार जेवण लागत. त्यासाठी पदार्थ बनवताना विविध मसाल्यांचा वापर केला जातो. त्याच मसल्याचा वापर करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. तो मसाला म्हणजे दालचिनी. होय दालचिनीचा (Cinnamon) आहारात वापर करून तुम्ही आरोग्य फिट ठेऊ शकता.

काय आहेत दालचिनीतील गुणधर्म?

दालचिनी ही अनेक औषधी गुणधर्मानी वेढलेली आहे. तसेच तिची चव ही सुंगंधित आणि मसालेदार असल्यामुळे तिचा विविध पदार्थ बनवताना हमखास वापर केला जातो. दालचिनी ही अनेक आजारांशी लढण्यास मदत करते.  दालचिनीचे पाणी पिऊन वजन घटते. ज्याप्रमाणे दालचिनी आजाराशी लढते. तसेच ती चरबी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रोज सकाळी उपाशी पोटी दालचिनीचे पाणी पिल्यास तुमच्या वजनात घट होऊ शकते. आणि तुमचे फिट राहण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. दालचिनीचे पाणी पिल्यास इतरही फायदे होऊ शकतात.

काय आहेत फायदे?

१) पचनशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर :

दालचिनीच्या रोजच्या सेवणामुळे तुमच्या पचनप्रक्रियेत फायदा होऊ शकतो. कारण दालचिनीमध्ये फायबर असल्यामुळे ते फायदेशीर ठरते. हे पाणी पिल्यामुळे पोट भरते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन आटोक्यात राहते.

२) मासिक पाळीत ठरते फायदेशीर :

दालचिनीचे पाणी उपाशीपोटी पिल्यामुळे स्नायूवर आराम पडतो. एवढेच नव्हे तर मासिक पाळीत अनेक महिलांचे पोट दुखते. त्यांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. त्यासाठी उपाय म्हणून दालचिनी अत्यंत फायदेशीर आहे. मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तसेच दालचिनीत कंपाऊंड क्युरक्यूमिन असल्यामुळे व्यायाम केल्यानंतर स्नायूंमधील सूज कमी करण्यास ते फायदेशीर ठरु शकते.

३) ऍसिडिटीवर मात करते :

पचनशक्ती वाढवण्याबरोबरच दालचिनी पचन सुधारण्यासाठीही उपयुक्त आहे. ह्यामुळे पोट फुगणे, गॅसेस होणे ह्यासारख्या समस्या दुर होऊ शकतात.

४) साखरेचे प्रमाण नियंत्रित करते:

वजन हे शरीरात वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळेही वाढते. दालचिनी मानवी शरीरातील साखर नियंत्रित करते. दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबायोटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असतात.  त्यामुळे तुमचे हृदय देखील निरोगी राहू शकते.