Wednesday, March 29, 2023

Citroen च्या कारवर 2 लाखांपर्यंत Discounts; संधी सोडू नका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन गाडी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्रेंच कार उप्तादक कंपनी Citroen आपल्या ग्राहकांना C5 Aircross आणि C3 या गाड्यांवर २ लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट देत आहे. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. Citroen India तिच्या हॅचबॅक, C3 वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि अन्य फायदे देत आहे तर C5 एअरक्रॉसवर 2 लाख रुपयांचा फायदे मिळणार आहे. मात्र यातील C5 Aircross वरील बेनिफिट फक्त 2022 मध्ये उत्पादक असलेल्या मॉडेल्ससाठी लागू आहेत. चला तत्पूर्वी जाणून घेऊया दोन्ही गाड्यांची खास वैशिष्ट्ये

Citroen C3 हॅचबॅक मध्ये1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन आणि 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 109bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे, C5 एअरक्रॉसला 2.0-लीटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन मिळते जे 174bhp आणि 400Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

- Advertisement -

कंपनी Citroen C3 कार तीन प्रकारात विकते. यामधील लाइव्ह व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.98 लाख रुपये आहे, फील व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.20 लाख रुपये आणि फील टर्बोची एक्स-शोरूम किंमत 8.25 लाख रुपये आहे. C3 मॉडेलवर 50000 रुपयांचा फायदा आणि 100% ऑन-रोड फंड दिला जात आहे. तर दुसरीकडे Citroen C5 एअरक्रॉसवर कंपनी कडून 2 लाख रुपयांची सूट दिली जात आहे