खासदार जलील यांच्यासह ११ जणांवर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा

औरंगाबाद | लॉकडाऊन रद्द केल्याचा जल्लोष साजरा केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांवर सिटीचौक पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लाॅकडाऊन तुर्तास स्थगित करण्यात येत आल्याचे जाहीर केले. त्यानंतर लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष इम्तियाज जलील यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. परिसरातून रॅली काढून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यात १४४ लागू असताना नियमभंग केल्याप्रकरणी जलील यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जलील यांना कधीही अटक होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.

इम्तियाज जलील यांच्या समर्थकांकडून जल्लोष केल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार यांच्याकडून आरोप करण्यात आले होते. तसेच रॅली काढल्यानंतर कारवाई होणार का असा प्रश्न लोकांच्याकडून केला जात होता.

You might also like