संतापजनक ! महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा जवानावर थुंकल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण काँग्रेसमधे (congress) मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीला ठिकठिकाणी काँग्रेसच्या (congress) नेत्यांकडून विरोध केला जात आहे. विरोध व्यक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. यादरम्यान एक अत्यंत घाणेरडा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन आंदोलन केल्याचं दिसत आहे.आंदोलन थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांना पकडण्यात येत आहे.

या आंदोलनादरम्यान महिला काँग्रेस (congress) राष्ट्रीय अध्यक्षा नेटा डिसूजा यांनी घृणास्पद कृत्य केले. त्या गाडीवर उभ्या असताना महिला जवानावर थुंकल्या. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकाराचा सर्व स्थरातून निषेध केला जात आहे. अशा प्रकारे महिला जवानावर थुंकणं हा मोठा अपमान आहे.

काँग्रेसच्या (congress) वरिष्ठ नेत्या जर असं कृत्य करीत असतील तर हे अत्यंत लाजिरवाणं असल्याचंही सांगितलं जात आहे. त्याच्या कृत्यावर लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अनेक शिवसैनिक नाराज, जोरदार घोषणाबाजी करत व्यक्त केला संताप

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा