व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महिला आमदाराच्या मागणीची दखल; विधीमंडळांच्या इमारतीमध्ये सुरु केला ‘हिरकणी’ कक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहेत. अधिवेशनात सत्ताधारी तसेच विरोधकांच्यामध्ये अनेक विषय, प्रश्नावरून वाद होत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वसामान्यांचा व आपुलकि, मदतीचा विषय जर आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घ्यायला गट-तट पाहत नाही. त्याचाच प्रत्यय त्यांनी विधिमंडळ परिसरात सुरु केलेल्या हिरकणी कक्षाच्या निर्णयावरून आला आहे.

घडलं असं कि, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह अधिवेशनास आल्या. अडीच महिन्याच्या प्रशंसकसह त्यांना पाहताच आता त्या बाळाला कोठे ठेवणार? त्याची कशी काळजी घेणार? त्यासाठी हिरकणी कक्ष या ठिकाणी नाही त्यामुळे त्या काय करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी “विधिमंडळ परिसरात महिला आमदारांना आपल्या बाळांची काळजी घेता यावी यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था राज्य सरकारने करावी. कारण उद्या भविष्य काळात अजून महिला आमदार निवडून येणार असून त्याही आपल्या बाळासह याठिकाणी येऊ शकतील,” अशी मागणी केली होती.

आमदार अहिरे यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत मिळताच त्यांनी तात्काळ मागणीची दखल घेतली. आणि नागपूर विधीमंडळांच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सुरू केला. त्यांनी घेतलेल्या या तत्पर निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या महिला आमदार आहिरे यांनी त्यांचे आभार मानले.

हिरकणी कक्ष

आहिरे यांच्या हस्तेच केलं हिरकणी कक्षाचे उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ निर्णय घेत विधीमंडळांच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सुरु केला. या कक्षाच्या उद्घाटनासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. सरोज अहिरे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह हिरकणी कक्षात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार आहिरे यांना हिरकणी कक्षाचे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सौ. सरोज अहिरे यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्याची विंनती केली. मुख्यमंत्र्यांच्या विंनंतीनंतर आमदार आहिरे यांनी कक्षाचे उदघाटन केले.