मास्क घालण्यात लाज कसली? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनचा इशारा देत विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप सोबतच राज ठाकरे,आणि उद्योगपती नआनंद महिंद्रा यांच्यावर निशाणा साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क घालण्यात लाज कसली, मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यावर देखील निशाणा साधला. दोन दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. तर, मास्क न वापरणाऱ्यांवरही जोरदार प्रहार केलाय.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment