व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मास्क हीच आपली ढाल, समजुतदारपणे सूचनांचं पालन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधणार साधला आणि लोकांना संभोधित केलं.

शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल तर ढाल. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल आहे अस उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय अस सांगत समजुतदारपणे सूचनांचं पालन करा अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’