Saturday, February 4, 2023

सोलापूरनंतर मुख्यमंत्री बुधवारी ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर; अतिवृष्टीच्या नुकसानीची करणार पाहणी

- Advertisement -

सोलापूर । राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लोकांच्या वैयक्तिक संपत्तीचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याने जनता हवालदिल झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची पाहणी दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी, १९ ऑक्टोबर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी ते उस्मानाबद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

उस्मानाबद जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांच्या पाहणीसह ते शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच प्रत्यक्ष शेतकरी-ग्रामस्थांशी संवादही साधणार आहेत, अशी माहिती शासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अकल्लकोट तालुक्यातील रामपूर गावाला भेट दिली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. “सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा शब्दांत मुख्यमंत्री जनतेला दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”