मी विरोधी पक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, पण मी विरोधी पक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नाही असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असून मालवणमधील चिवला बीच येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान संवेदनशील आहेत. त्यांनी गुजरातला मदत केली. महाराष्ट्रालाही नक्कीच मदत करतील, असा चिमटा काढतानाच आम्हाला राजकारण करायचे नाही, विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचं आणि माझं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी या नात्यात बाधा येणार नाही, असंही ते म्हणाले.

पंचनामे पूर्ण झाले असून याचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करु. केंद्राच्या निकषाप्रमाणे तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत, पण एकूण आढावा घेतल्यानंतर आणखी काय करायचं असेल ते आम्ही करणार आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment