उद्धव ठाकरे यांच्याकडे पंतप्रधान होण्याची ‘ती’ ताकदचं नाही!- रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची ताकद नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी आठवले म्हणाले कि, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण देशात पक्ष असावा लागतो. महाराष्ट्रातील १८ खासदारांच्या जीवावर देशाचा पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्याची केवळ इच्छा असून चालत नाही, त्यासाठी तेवढी ताकदही लागते. उद्धव ठाकरे यांच्यात ती ताकद नाही,’ असे परखड मत रामदास आठवले यांनी मांडले. त्यामुळे आता यावर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रामदास आठवले सोमवारी नवी मुंबईतील वाघवली गावात असणाऱ्या बौद्ध लेण्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. याठिकाणी विकास प्रकल्पासाठी सिडकोमार्फत बौद्ध लेणी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर आज रामदास आठवले यांनी बौद्ध लेण्यांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

अयोध्येत बौद्ध मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करणार
बौद्ध लेण्यांची पाहणी करण्यासाठी आलेल्या रामदास आठवले यांना अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा रामदास आठवले यांनी म्हटले की, ‘मी राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला जाणार नाही. त्याऐवजी अयोध्येत बौद्ध मंदिर बांधण्यासाठी आपण प्रयत्न करु,’ असे रामदास आठवले यांनी सांगितले. याशिवाय राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार नसल्याचेही आठवलं यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment