मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत.

उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (30 मे 2021 )उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले

मुख्यमंत्री नक्की काय बोलणार किंवा जनतेला काय आवाहन करणार हे आज पाहावे लागेल. कारण राज्यात एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे शासनाच्या उपाययोजना कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. राज्यात ऑक्सिजन आणि बेड चा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळी मुख्यमंत्री जनतेला काय संभोधित करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like