शिवजयंती उत्साहाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पहा काय आहेत नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 19 फेब्रुवारी ला शिवजयंती आहे. गत 2 वर्षात कोरोनामुळे शिवजयंती साजरी करण्यात काही निर्बंध होते. यंदा कोरोनाचे सावट काही प्रमाणात कमी असून सरकारने शिवजयंती उत्सव सार्वजनिक पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गृहविभागाने दिलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, असा प्रस्ताव गृह विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. परंतु आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत. त्यामुळे यंदाची शिवजयंत धूमधडाक्यात पार पडणार आहे. या नव्या नियमावलीनंतर शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Leave a Comment